मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे ) :-
समोर आलेल्या घडामोडींवरून कळते आहे की,निलेश देवराम दावडा आणि एम. एस. भाईजी या एकाच सोसायटीतील व्यक्तींच्या वादातून अखेर सत्यघटना उघडकीस आली आहे…मुंबईतील एल.टी. मार्ग येथील अशोका शॉपिंग सेंटर प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि. या एकाच इमारतीत राहणाऱ्या सदर दोन्ही मधील वादात ठिणगी पडून काही अनाकलनीय गैर-व्यवहार उघडकीस आले… एम.एस.भाईजी हे उपरोक्त संस्थेत सभासद नसतांना भागीदार आणि चेअरमन म्हणून संस्थेचे कामकाज पहात होते… सदर इमारतीमधील अजय उबाळे यांचा गाळा क्रं.४१ भागीदारी करून स्वतःच्या नांवे करून घेतला आहे… सदर दाखल्याच्या अनुषंगाने सोसायटीच्या कमिटीत पदार्पण करत सदस्य समितीच्या निवडणुकीद्वारे चेअरमन होऊन गेली २५ वर्षे या पदावर कार्यरत आहेत… दरम्यान याच इमारतीमधील मूळ सदस्य निलेश देवराम दावडा यांच्या नजरेस एम.एस.भाईजी यांची कृष्णकृत्य लक्षात येऊन त्यांनी चेअरमन एम.एस.भाईजी यांच्या विरोधात… संस्थेचे सभासद नसताना बेकायदेशीरपणे पदभार स्विकारणे व सांभाळणे याविरोधात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-१९६० अंतर्गत कलम-१५४ अन्वये दि. १३/२/२०२५ रोजी तक्रार नोंदवली असून एम. एस. भाईजी यांना तत्पर चेअरमन पदावरून कायदेशीर पदच्युत करण्यात यावे असे म्हटले आहे…. कारण भाईजी यांनी बेकायदेशीर चेअरमनचे पदभार सांभाळत बहुतांश गलथान प्रकार केलेले आहेत…. संस्थेची गच्ची मनमानी पद्धतीने तत्वावर दिली आहे, संस्थेच्या मोकळ्या जागेवर वाहनतळ दाखवून परस्पर विक्री व्यवहार केला आहे… तसेच संस्थेच्या सभासदांचा विरोध असतानाही इमारतीमध्ये वातानुकूलित यंत्रणेचे कामकाज सुरू केले आहे… तळमजल्यावर बेकायदेशीर गोडाऊन्स बनवून विक्रीस काढली आहेत…. संस्थेत कोणताही स्वतःचा गाळा नसताना सर्व सभासदांना अंधारात ठेवून स्वतःस सभासद व चेअरमन पदी देखील धारण केलेले आहे…
अशा अनेक गैरव्यवहारांबाबत त्यांच्या विरोधात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अन्वये चौकशी करण्यात यावी, असे अर्जदार निलेश देवराम दावडा यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे… पोलीस ठाण्यात संबंधित तक्रार दाखल करण्यात आली असून, मुंबई उच्च न्यायालयात यासंबंधीची सुनावणी सुरू आहे… दि. १४/३/२०२५ ला दुपारी सुनावणी असून, आवश्यक कागदपत्रांसह एम.एस.भाईजी यांनी या सुनावणीस उपस्थित रहावे असा न्यायालयाचा आदेश आहे…