पेण पोलीसांकडून अट्टल घरफोडी करणा-या चोरास अटक… आरोपी हरिश्चंद्र उर्फ गुड्‌डू बाळकृष्ण म्हात्रे गजाआड…

0
32

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

पेण पोलीस ठाणे हद्दीत काश्मिरे गावात वारंवार घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पोलीस सहाय्यक निरीक्षक समद बेग तसेच पोलीस पथकाकडून सखोल तपास करण्यात येत असताना काश्मीरे-कांदळेपाडा येथील फिर्यादी सौ. संगिता खंडू पाटील वय ४४ वर्षे या शेतावर गेल्या असताना अज्ञात चोराने बाथरूमच्या खिडकी फोडून घरात शिरून ३लाख ७४ हजार ३०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून नेणाऱ्या अज्ञात चोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्याला पेण येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे.काश्मीरे येथे रहाणाऱ्या हरिश्चंद्र उर्फ गुड्‌डू बाळकृष्ण म्हात्रे असे पोलिसांनी गजाआड केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ४५ हजार रूपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जप्त करण्यात आली असून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे…

सदरची कामगीरी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी समद बेग,सहा. फौजदर राजेश पाटील, संतोष जाधव, राजेंद्र भोनकर, प्रकाश कोकरे, सुशांत भोईर,अजिंक्य म्हात्रे, सचिन व्हरकोटी, अमोल म्हात्रे, गोविद तलवारे यांनी केलेला असुन सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपुत तसेच प्रतीक पोकळे यांच्याकडून करण्यात आली असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.