क्रिकेटच्या मैदानात सुनिल तटकरे यांची राजकीय टोलेबाजी… रायगडच्या पालकमंत्री पदावरून जोरदार फटकेबाजी…

0
59

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार राजकीय फटकेबाजी केली. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या रस्सीखेच पाहायला मिळते आहे… सुनील तटकरे यांनी म्हटले आहे की, पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो. मग स्लो मोशनमध्ये कळतं की आरडाओरडा करणाऱ्यांपेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो.कॅप्टन कुल असेल तर सामन्यात यश मिळतं. जर तो भडक डोक्याचा असेल तर सगळे खेळाडू पण भडक डोक्याचे होतात आणि मग मॅचची वाट लागते, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. यावेळी तटकरे यांच्या राजकीय फटकेबाजीचा उपस्थित क्रिकेट प्रेमींनी मनमुराद आनंद घेतला.