मराठी युवक हो…जागते रहो… क्रिकेट विरंगुळा म्हणून खेळा…

0
52

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

शनिवारी,रविवारी किंवा सुट्टी असेल तेव्हा गल्ली -क्रिकेट खेळत राहू नका.. क्रिकेट विरंगुळा म्हणून खेळा. क्रिकेटमध्ये तुमचे करिअर होईल असे जर का वाटत असेल तर आता.. तो तुमचा फक्त भ्रम आहे…उलट कोणत्याही रेल्वे स्टेशनवर पहा.. युपी,बिहारची मुले मोठ्या पगाराच्या आणि सरकारी रेल्वे-टीसीच्या नोकऱ्या करतांना दिसतात आणि ही सगळी अगदी २५ ते ३० वयोगटातील असतात…त्यांनी भावी आयुष्यासाठी Future Planning, Goal- Perceiverance एक ध्येय आणि चिकाटी बाणावलेली दिसते… त्यासाठी ते तळमळीने सरकारी स्पर्धा-परीक्षा देण्यासाठी झटताना दिसतात…आणि बरे कां ते Upsc, Mpsc उत्तीर्ण असतात.. आणि म्हणूनच ते अशा मोठ-मोठ्या सरकारी पदांवर व पगारावर असतात. महाराष्ट्र आपला आहे..पण,अनेक सरकारी बॅंका, रेल्वे आणि अन्य सरकारी कार्यालये यातून  यूपी आणि बिहार येथील ही मंडळी दिसत असतात…

आपण उगाचच त्यांच्याविषयी वेगळा ग्रह करून पहात असतो,पण आपणही कुठेतरी चुकतो आहोत.. आपलीही मराठी मुलं अशी सर्वत्र पाहण्याची इच्छा असेल तर प्रथम आपण आपले भावी आयुष्यासाठी एक धोरण मनात स्थिर केले पाहिजे..त्यासाठी जिद्दीने व चिकाटीने मैदानात उतरले पाहिजे.. पण गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी नव्हे तर अशा सरकारी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी..अगदी ध्येयाने…आणि मग पहा अटकेपार मराठी साम्राज्याची पताका फडकवणाऱ्या बाजीराव पेशवा प्रमाणे  आजचा मराठी माणूस कुठे मागे राहतो का…?या परप्रांतीयांचे निश्चितच त्यामागे त्यांचा ध्यास, चिकाटी आणि कष्ट आहेत हे आपण कदापि विसरता नये..आपण त्यांना फक्त तिरक्या नजरेने सतत पहात असतो.. पण खरं तर आपल्या कमी शिक्षणाच्या अभावाचा तो परिणाम असतो…आणि म्हणूनच आपल्या मराठी मुलांना फक्त ऑफिस-बॉय, हेल्पर, हाऊस किसींग अशी हलक्या दर्जाची कामे मिळत असतात..लक्षात ठेवा इथूनही पुढे जर का तुमच्यात हा अमुलाग्र बदल घडला नाही तर.. तर मात्र हीच परप्रांतीय सुशिक्षित मुले आपल्या मुलांना पुढे अशीच हीन दर्जाची सुमार कामे करायला लावणार… यात शंकाच नाही…तरुण मुलांनो शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवसात काही असे कोर्सेस आहेत ते करा की तुमचीही पावलं या परप्रांतीय मुलांप्रमाणे प्रगतीपथावर नक्कीच असाल.. याला कुण्या जोतिष्याची मुळीच गरज नाही..