गेल कंपनी पाईप लाईन भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ रद्द करा:काशिनाथ पाटील यांची मागणी…

0
27

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-

गेल (गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) कंपनीच्या पाईप लाईनसाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी पेण उपविभागिय कार्यालयासमोर दिनांक २०-०२-२०२५ रोजी बाधित शेतकरी एक दिवस उपोषणास बसले होते…  याबाबतचे लेखी निवेदन संबंधित अधिकारी यांना दिले असल्याचे २४ गाव सेझ विरोधी शेतकरी संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच काशिनाथ पाटील यांनी दिले होते….

गेल (गॅस अँथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) कंपनीची पाईप लाईन ही पेण तालुक्यातील रावे, कोपर, डावरे, हनुमानपाडा, जोहे, कळवे, कणे, बोझें, ओढांगी, वाशी, बोरी, वडखळ, शिर्की, बोर्वे, मसद आदी गावातील शेतकऱ्यांच्या सुपिक शेतजमिनीतुन जात आहे… या पाईप लाईनसाठी पेण तालुक्यांतिल १३ गावांतील अनेक शेतकऱ्यांची जमिन संपादन होणार आहे… हे सर्वच शेतकरी अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत…. या सुपिक शेत जमिनी शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे जीवन धारणेचे साधन आहे… या पाईप लाईनच्या संपादनामुळे वरील सर्व गावातील शेतकऱ्यांचे अपरिमित कधीही भरून न निघणारे प्रचंड नुकसान होणार आहे… या गॅस  लाईनमुळे हमरापुर विभाग, वाशी विभाग, वडखळ विभाग पुर्णतः उध्वस्त होऊन पाईप लाईन लगतच्या परिसरातील नागरीकांचा, रहिवाश्यांचा सुरक्षीततेचा व जिविताचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे… त्यामुळे या भूसंपादनासाठीच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे…. तसे वेळोवेळी शेतकऱ्यांनी संबंधीतांना कळविलेले असल्याचे काशिनाथ पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले….