सकल मराठा समाजच्या वतीने कुंभारवाडा येथे शिवजयंती साजरी…गड किल्ल्यावरून शिवज्योत आणून महान विद्वानाला आदरांजली… 

0
39

मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे ):- 

गुरुवार दि. २०-०२-२०२० रोजी सकल मराठा समाजच्या वतीने दक्षिण मुंबईतल्या कुंभारवाडा गोल देऊळच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठया थाटामाटात साजरी करण्यात आली…. रयतेचे राजे, करोडो जनतेचे हृदयात स्थान असणारे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अष्टप्रधान मैरू, आधीपाती, कुलपती, राजाधिराज, सगळ्यांच्या मनातले ताईत असलेले छत्रपती शिवाजी शहाजी भोसले यांच्या ३९५ व्या जयंती दिनाचे औचित्य साधत देशभर नव्हे, तर जगभरात शिवजयंती साजरी करण्यात येते… अशातच देशभर शिवजयंतीचा उत्साह दिसून आला…

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या सगळ्यांना गड किल्ल्यावर शिवज्योत तेवत ठेवण्यात आल्या आहेत, तर महाराष्ट्रात या पराक्रमी, शूरवीर, योद्धाच्या गड किल्ल्यावरून शिवज्योत आणून  या महान विद्वानाला आदरांजली वाहण्यात आली… सकल मराठा समाज दक्षिण मुंबईच्या वतीने चेंबूर येथे सकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढी पुतळा असून, येथे शिवरायांना मानवंदना दिल्यानंतर शिवज्योत ही बाईक रॅली काढून गिरगावातल्या कुंभारवाडा गोल देऊळ अशी बाईक रॅली आणि मिरवणूक काढण्यात आली… यावेळी सगळ्या पदाधिकारी आणि शिवप्रेमिनी वेगवेगळ्या रंगाचे कुर्ते, धोती, सदरे, फेटे, भगवे झेंडे, भगव्या टोप्या असा पारंपरिक ऐतिहासिक पोशाख परिधान करत या शिवजयंती सोहळ्यातील मिरवणुकीत सहभागी होऊन शिवरायांना मानवंदना दिली तसेच दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले….

सकल मराठा समाज दरवर्षी शिवजयंती मोठया थाटामाटात, जल्लोषात आणि उत्साहत साजरी करतात… शिवरायांचा पाळणा हलवून, बाळ गीत सादर करून जन्म सोहळा घेण्यात आला…  शिवरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली… शिवरायांवर ऐतिहासिक व्याख्यान घेण्यात आले…. महिलांसाठी हळदीकुंकू आयोजित करण्यात आला… जागरण गोंधळचा मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला… भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले… दक्षिण मुंबईतल्या विभाग प्रमुख, आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि सगळ्या अंगीकृत संघटना व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि सकल मराठा समाजच्या पदाधिकाऱ्यांचा यथोनिश्चित मान सन्मान सोहळा घेण्यात आला…. संध्याकाळी आरती पूजा करून शिवरायांची पालखीमिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला…. ढोल ताशा पथक, पारंपरिक देखावे, फटाक्यांची आतषबाजी हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते… सकल मराठा समाज जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत असाच उत्साहने, आनंदाने शिवजयंती साजरी करत राहीन, असे उदगार सकल मराठा समाजाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत भोसले यांनी काढले… शाल, पुष्पगुच्छ आणि शिवरायांची प्रतिमा असे सन्मान सत्कार सोहळ्याचे स्वरूप होते…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरी ताई पेडणेकर, दक्षिण मुंबई महिला विधानसभा संघटिका आणि माजी नगरसेविका युगंधरा साळेकर, शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख सुनिल शिंदे, भाजपाचे सचिव अतुल शहा तसेच वी पी रोडचे पोलीस महासंचालक, निरीक्षक, उप निरीक्षक, शिपाई, सकल मराठा समाज दक्षिण मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, अनिल सुर्वे, संतोष शेजवळ, संतोष जाधव, भरत पाटील, सुभाष सुर्वे, शैलेश शिंदे, प्रभाकर दाते, महेंद्र भेकडे, बजरंग गायकवाड, राहुल कदम, योगेश भणगे, महेंद्र लकडे, अर्जुन गोळे, रामदेव कदम, पंकज विचारे, मीना गोळे, करुणा गोळे आणि सगळ्याच क्षेत्रातील नामवंत पदाधिकारी, शिवप्रेमी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते…