पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
मुंबई गोवा हायवेवरील पेण तरणखोप येथे होंडा कंपनीचे अधिकृत विक्रीते आणि पनवेल अलिबाग येथे होंडा कंपनीचे शोरुम तसेच वाहनांची विक्री, सर्विस सेंटर, स्पोर्ट स्टोअर्स असलेले दशमेश होंडा कंपनीचे मालक यांनी आपल्या व्यवसायत अधिकची भरारी घेत नवीन दशमेश होंडा शोरूमचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याचे आर. टी. ओ. अधिकारी महेश देवकाते यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले…
याप्रसंगी ओनर कोहली यांनी सुरू केलेल्या होंडा शोरूममधील वाहनांची लवकरच विक्री होऊन शोरुमचे मोठ्या शोरूममध्ये रूपांतर होण्यासाठीच्या शुभेच्छा आर. टी. ओ. अधिकारी महेश देवकाते यांनी दिल्या… यावेळी ओनर स्वरण पाल सिंह सिंग कोहली व तरण कोहली, झोनल इनचार्ज रखी सान एरिया इनचार्ज अविनाश सान, जनरल मॅनेजर सेलस नविन झा, सर्विस मॅनेजर राजू नायर, सरपंच दर्शना दिनेश पाटील आदी उपस्थित होते….