पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, मराठा साम्राज्याचे संस्थापक, संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रसह देशभरात त्यांच्या शौर्याच्या आणि न्यायप्रिय कारभाराच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शिवजयंती मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, शिव व्याख्याने आयोजित केली जातात… मात्र या दिवशी दारूची दुकाने, बार, रेस्टॉरंट मध्ये सर्रास मद्य विक्री केली जाते, ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे….
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व इतर दिवशी “ड्राय डे” असतो…. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने तात्काळ “ड्राय डे” घोषित करावा…. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, सर्व खासदार, आमदार यांना पत्र देऊन सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी मागणी केली आहे….