रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील पंचायत समिती येथे असणाऱ्या अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा उपविभागाचे उप अभियंता यांच्या खोट्या सह्या करून शासनाची फसवणूक केली असल्याप्रकरणी राहुल शरद देवांग (वय ४६ वर्षे, उप अभियंता पनवेल, मूळ रा. मु.पी.धुळे, ता.जि.धुळे सध्या रा. सी/६-१४, प्लॅट नंबर १०, रोड नंबर २. सेक्टर १८ नवीन पनवेल जि.रायगड) यांनी नाना एकनाथ कोरडे (रा. अलिबाग ता. अलिबाग, जि.रायगड उप अभियता ग्रामिण पाणी पुरवठा उपविभाग अलिबाग वरिष्ठ सहायक) यांच्याविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे…
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या अलिबाग पंचायत समिती येथील ग्रामिण पाणी पुरवठा उपविभाग येथे वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे नाना कोरडे याच्याकडे कर्मचारी यांचे वेतन देयक तयार करण्याचे काम आहे…
नाना कोरडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या कामाचा गैरवापर करीत जुलै २०२३ ते डिसेंबर २०२४ पर्यंत त्यांच्या कार्यालयातील ७ कर्मचारी यांचे वेतन देयकामध्ये वाढीव वेतन वाढ असा एकुण १ कोटी २३ लाख २१ हजार ४९९ रू असा फरकाची बनावट वेतन देयक बनवुन सदरची रक्कम उप अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा उपविभाग अलिबाग यांच्या खाते क्र. ०४६०२०३०००००३०८ येथे जमा असताना उपअभियंता निहाल चवरकर यांच्या खोटया सहया बँक चलनावर करून सदरची रक्कम स्वतःच्याच त्यांच्या पत्नी सोनाली कोरडे तसेच इतर नातेवाईक यांच्या वेगवेगळ्या खात्यवर घेवून अपहार केला व सदरची चाब निदर्शनात आली असता सदरची रक्कम परत उप अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा उपविभाग अलिबाग येथे जमा करून शासनाची दिशाभूल करून फसवणुक केली आहे….
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं.३२/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ ३१८(४), ३१६(५), ३४४, ३३६ (२), ३३८, ३३६ (३), ३४० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भारत फार्णे हे करीत करीत आहेत….