रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळावे अशी शिंदे शिवसेना व तमाम जनतेची प्रखर इच्छा आहे. गरिबांचे शेठ व सर्वसामान्य जनतेचे आधारवड म्हणून जनतेच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे मंत्री भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हावेत यासाठी विविध प्रसिद्ध प्रार्थना स्थळी जाऊन कार्यकर्ते कट्टर समर्थक प्रार्थना करीत आहेत. मंत्री भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हावे यासाठी शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते तथा मंत्री गोगावले, आमदार दळवी यांचे कट्टर समर्थक मंजर भाई जुईकर यांनी अजमेर दर्गा शरीफ येथे जाऊन मन्नत केलीय. नामदार भरतशेठ गोगावले पालकमंत्री झाल्यावर त्यांना व आमदार महेंद्र दळवी यांना घेऊन अजमेर दर्ग्यात जाऊन तिथे दोन लाखाची नियाजाची ढेक करणार असल्याचे मंजरभाई जुईकर यांनी सांगितले. मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री झाल्याचे पाहण्याची तमाम रायगड वासीयांची इच्छा असून तेच पालकमंत्री पदाचे मुख्य दावेदार आहेत, त्यामुळे तेच पालकमंत्री व्हावेत अशी मन्नत अजमेर इथं जाऊन केली असल्याचे मंजरभाई जुईकर यांनी सांगितले.