रेडी मिक्स काँक्रीट तथा आरएमसी प्लांट धोकादायक… अमित म्हात्रे यांच्यासह अनेक शेतकऱ्याचा आरोप…

0
40

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबाग-वावे मार्गावरील कावीर गावानजीक रस्त्याला लागूनच रेडी मिक्स काँक्रीट तथा आरएमसी प्लांट उभारण्यात येणार आहे… हा प्लांट नारिकांसह महिला, लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणारा असल्याने तो धोकादायक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी केला आहे… या अवैध प्लांटविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे… अमित म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार,कावीर गावाचा परिसर रहिवासी व शेती क्षेत्र म्हणून घोषीत आहे… या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती असून शेती करणाऱ्यांची संख्यादेखील प्रचंड आहे… मात्र गेल्या काही दिवसांपासून कावीर गावानजीकच अलिबाग-वावे रस्त्याच्या बाजूला आरएमसी प्लांट उभारण्यास सुरुवात झाली आहे… चेन्नई येथील आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीमार्फत ते काम केले जाणार आहे… हा भाग कृषी व रहिवासी क्षेत्राचा असल्याने औद्योगिक प्रकल्प उभारणे बेकायदेशीर आहे…. या प्लांटपासून हाकेच्या अंतरावर दोन शाळा आहेत… त्यामुळे या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे… या प्लांटमधून होणारा धुळ, सिमेंट कणामुळे श्वसनाबरोबरच डोळ्यांचे व त्वचेचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या परिसरातील आंबा व इतर पिकांच्या क्षेत्राला धोका निर्माण होऊन पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे… बेकायदेशीर सुरु असलेल्या या प्लांटला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे… तरीदेखील ठेकेदाराकडून या ठिकाणी काम सुरु आहे… त्यामुळे नाराजीचे सुर उमटू लागले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले… याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यापासून तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनाही लेखी पत्र देण्यात आल्याचे ते म्हणाले… त्यामुळे या प्लांटच्याविरोधात जिल्हा, तालुका प्रशासन काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे…