अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग बस स्थानकासमोर दोन बसचा व मोटरसायकलस्वाराचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे… या भीषण अपघातात मोटारसायकलस्वाराचा चिरडून जागीच मृत्यू झाला… जयदीप बना असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे… अपघातानंतर मृत तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी बस स्थानकात जोरदार राडा केला… व अपघातग्रस्त एसटी बसेसच्या काचा फोडून वाहतूक रोखून धरली… यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले… या अपघातात एका रिक्षाचेही नुकसान झाले आहे… दोन्ही बसेस अलिबाग बस स्थानकात प्रवेश करीत असताना या दोन बसेसच्यामध्ये हा तरुण आल्याने अपघात झाल्याची माहिती तेथील नागरिकांकडून समजली आहे…