0
25

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-

महाड तालुक्यातील श्रीक्षेत्र घुरूपकोंड येथे महाशिवरात्री निमित्त श्री शंकर मंदिरात मंगळवार दि. २५ फेब्रुवारी ते गुरूवार दि. २७ फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे ५३ व्या वर्षी यशस्वी आयोजन करण्यात आले आहे…. तीन दिवस चालणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे….

मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. पासून शंकराला अभिषेक, घटस्थापना ज्ञानेश्वरी पूजन, दिपपूजन, ध्वजारोहन, हरिपाठ, किर्तन, हरिजागर असे कार्यक्रम श्री. गजानन पाटणे, योगेश भुवड, दत्ताराम पाटणे, सुरेश काप, विलास पाटणे, हभप. हरिश्चंद्र सकपाळ, अशोक घुरूप, सुहास चिविलकर, दौलती काप, गजानन काप, मारूती भुवड, किसन बाटे, संदिप वाजे आदींच्या हस्ते पार पडले… बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त सकाळी काकड आरती, दिंडी सोहळा, हरिपाठ, किर्तन, हरिजागर, तर गुरूवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी पहाटे काकड आरती हभप गजाननबुवा काप व ग्रामस्थ मंडळ घुरूपकोंड सकाळी ८ वा. काल्याचे किर्तन हभप. प्रविण महाराज सकपाळ तुर्भे, सकाळी महाप्रसाद ग्रामस्थ मंडळ घुरूपकोंड, दुपारी १२ ते २ श्री सत्यनारायण पूजा अशा विविध कार्यक्रमांनी या सप्ताहाची सांगता होणार आहे…

या सोहळ्या दरम्यान गावातील जेष्ठ नागरिक व अन्नदाते, देणगीदार यांच्या सन्मान करण्यात आला…. तर महाड गटाच्या महिला अध्यक्षा सौ. मयुरी भुवड यांनी भेट दिल्याबद्दल त्यांचा सौ. अर्चना घुरूप, सौ. राजश्री काप, ॲड. सौ. सुप्रिया पाटणे, सौ. रिया गोलांबडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला… हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ, मानाई महिला मंडळ, तरूण मित्र मंडळ, ग्रामविकास मंडळ घुरूपकोंड हे अथक परिश्रम घेत आहेत….