माणगावमध्ये आढळल्या तीन बेवारस मोटारसायकल … ओळख पटविण्यासाठी माणगाव पोलिसांचे आवाहन…

0
64

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

माणगाव पोलिस ठाणे अंतर्गत तीन बेवारस मोटारसायकल आढळून आल्या असून माणगाव पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी आवाहन केले आहे. सविस्तर वृत्त असे की,  माणगांव पोलीस ठाणे हद्दी मध्ये तीन वाहन बेवारस स्थितीत मिळुन आलेले  आहेत.  तरी सर्व नागरीकांना माणगाव पोलिसांनी  आवाहन केले की, ज्याची मोटार सायकल किंवा इतर वाहने चोरीस गेली असल्यास आपण माणगांव पोलीस ठाणे येवुन आपले वाहना बाबत खात्री करावी व आपला मालकी हक्क सिध्द करुन आपले वाहन घेवुन जावे. अन्यथा सदरील बेवारस वाहनाची रितसर शासकीय नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येईल. लिलावा नंतर कोणाचेही म्हणणे ऐकुण घेतले जाणार नाही. सदर बेवासर वाहनाचा नंबर १) ब्लॅक रंगाची जुनी प्लसर १५० सीसी नंबर नसलेली, चेसीस व इंजीन नंबर स्पष्ट दिसत नसेलली मोटार सायकल २) ब्लॅक रंगाची जुनी प्लसर १५० सीसी नंबर नसलेली, चेसीस व इंजीन नंबर स्पष्ट दिसत नसेलली मोटार सायकल ३) प्लॅटीना बजाज हिरव्या रंगाची एम.एच.०२ एफ.ओ. ३७२४ असा आहे.