छावा चित्रपट पटांगणाच्या पडद्यावर दिसणार… संभाजी महाराजांचा इतिहास पडद्यावर दाखविणार…

0
102

कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):- 

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे… पहिल्या तीन चार दिवसांत या चित्रपटाने मोठी कमाई करत नवा रेकॉर्डही बनवला आहे… हा चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येक जण भावूक होताना दिसून येतो आहे… अनेक जण विक्की कौशलच्या अभिनयाचे कौतुक करत आहे… अशातच संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आता पडद्यावर बघता यावा यासाठी मोफत शोचे आयोजन करण्यात आले आहे… दिनांक 3 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता उकरूळ या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सचिन मिसाळ यांनी छावा चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन केले आहे…