शिवसत्ता टाइम्स देवेंद्र मोरे रत्नागिरी
महाराष्ट्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी एसएसआरपी म्हणजे “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन-नंबर प्लेट” बंधनकारक केली आहे… नवीन नियमानुसार आता सर्व जिल्ह्यातील वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एचएसआरपी बसविण्याच्या अंमलबजावणी बाबतची कार्यवाहीची सुरुवात येथील सर्व उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयांतून म्हणजेच आरटीओ ऑफीस कडून सुरू झालेली आहे… उदाहरणार्थ रत्नागिरी आरटीओसाठी मेसर्स रिअल मेझॉन इंडिया लि. ही एजन्सी निश्चित करण्यात आली असून, या एजन्सीचे चार शहरांत फिटमेंट सेंटर्स आहेत, त्यांच्या पोर्टलवर http//hsrpmhzone2.in बुकिंग करून या सेंटर्सवर एचएसआरपी आपल्या वाहनांवर बसवावी लागेल, त्यासाठी आता ३०-एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे… तरी आपापल्या ठिकाणच्या नियोजित प्रादेशिक परिवहन कार्यालयात म्हणजेच संबंधित RTO ऑफिसमध्ये जाऊन तेथील HSRP Plate साठीच्या फिटमेंट करिता नियोजित एजन्सीची Portal Site मिळवायची आहे…
HSRP अर्थात हाय सिक्युरिटी-नंबर प्लेट म्हणजे वाहनाच्या नंबर प्लेट वरील छेडाछेडी उघडकीस येणे, असे गुन्हे कमी होऊन वाहनांची तात्काळ ओळख पटणे व त्यांच्या सुरक्षिततेसाठीचे हे एक प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) महत्वाचे बंधनकारक पाऊल आहे…