नवीन बोगद्यामध्ये लोखंडी केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग… सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही…ट्रकचे केबिन जळून खाक…

0
30

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली एक्झिट नवीन बोगदामध्ये रात्रीच्या सुमारास मुंबई लाईनवर लोखंडी केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागण्याची घटना समोर आली आहे.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसून  ट्रकचे टायर केबिन जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट,आयआर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, आणि खोपोली नगर पालिका अग्निशमन दल घटनास्थळी पोहचल्यावर जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले व आग विझविऊन अपघातग्रस्त ट्रक क्रमांक MH 43 BX 7967 घटनास्थळावरून क्रेनचे सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती…ट्रकला साईटला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली…

ट्रकच्या केबलला लागलेल्या आगीमुळे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने अंधारात काहीच दिसत नव्हते. बोगद्यातील इतर वाहनातले सर्व प्रवासी श्वसनास  त्रास जाणवल्याने बोगद्याच्या बाहेर आले होते. मुंबईकडे  जाणारी वाहतूक संपूर्णपणे खोळंबली होती. हीच घटना जर बोगद्याच्या मध्यभागी अर्थात आत घडली असती तर परिस्थिती अजून भयानक असती…सर्व यंत्रणांनी आग विझविण्यासोबत इतर वाहनातील प्रवाशांना सुरक्षितपणे धुरापासून श्वसनास त्रास होणार नाही…याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले…त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही…