रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड जिल्ह्यातील वडखळ अलिबाग दरम्यान असणाऱ्या शहाबाज येथे घरफोडीचा प्रयत्न केल्याबाबतची फिर्याद दिवाकर गोविंद भगत ( वय 79. धंदा सेवानिवृत्त, रा. मुळ रा. शहबाज पो. शहबाज ता. अलिबाग सध्या जिवदानी दर्शन ५.3/745,विर सावरकर मार्ग,अरुणेदय नगर, मुलुड वेस्ट मुंबई) यांनी पोयनाड पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथे दिनांक 02/03/2025 रोजी 01:00 वा च्या सुमारास फिर्यादी दिवाकर भगत यांचे बंद घराचे दर्शनी दरवाजाचा कडीचा कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून त्यावाटे घरात प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा कोणत्यातरी हत्याराने तोडुन कपाटात ठेवलेले 53,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व चांदीची छत्री घरफोडी चोरी करुन चोरुन नेले तसेच फिर्यादी यांचे प्रमाणेच फिर्यादी यांचे गावातील सुनंदा दामोदर मोडखकर,अजिंक्य रविद्र पाटील, धनजय जनार्दन पाटील यांचे घराचे दरवाजाचे कडीचे कोंडे तोडुन त्यांची एकुण 44,500/- रुपये रोख रक्कम चोरट्यांनी घरफोडी चोरी करुन चोरुन नेलेले असुन गावातील प्रतिभा रविंद्र मोडखरकर, पांडुरंग त्रंबक पाटील, राजेंद्र मुरलीधर पाटील, अच्युत मुरलिधर पाटील, प्रेमनाथ रामचंद्र ठाकुर, रोहित विदयाधर ठाकुर यांचे घरात सुध्दा घरफोडीचा प्रयल केला आहे.
याबाबत पोयनाड पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(2),331(3),305(a),62 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई/अशोक मरस्कोले हे करीत आहेत.