दापोलीतील आंजर्ले तरीबंदरावरील फायबर मासेमारी नौका व चार होड्या जळून भस्मसात…

0
27

दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-

दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील तरीबंदरावरील फायबर बोटीसह होड्या जळून खाक झाल्याची बातमी समोर आली आहे.येथील तरीबंदरावरील मासेमारी नौका उभ्या करून ठेवण्यासाठी ठेवलेली लाकडे आणि जवळच असलेली एक फायबर बोट आणि चार छोट्या होड्या अज्ञाताने लावलेल्या आगीत जळून खाक झाल्या. यामध्ये मच्छीमाराचे जवळपास सुमारे ५ लाख ५५ हजारांहून अधिक नुकसान झाले आहे.या प्रकरणाची तक्रार पाजपंढरी-हर्णै बंदरातील मच्छीमारांनी हर्णै दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात केली आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. डी. पवार, हेडकॉन्स्टेबल संतोष सडकर आणि दिलीप नवाळे करीत आहेत.