शिवसत्ता टाईम्सच्या बातमीचा इम्पॅक्ट… मगरींना पकडण्यासाठी वन विभाग आणि बचाव पथक दाखल…

0
20

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-

येथील  तलावाच्या काठावर विशेषतः रात्री ९ वाजल्यानंतर मगरी फिरतात आणि रस्ते ओलांडून जवळली मानवी वस्ती भागात शिरत असतात… माणगाव शहरातील खांदाड गावात असलेल्या तलाव परिसरात श्री. वालेराव यांचे निवासस्थान आहे…. या बाबतच्या बातम्या आमच्याकडून मागेच प्रसारित झाल्या होत्या…. दरम्यान मोठ्या संख्येने सरपटणाऱ्या प्राण्यांना पाहून रस्त्यावरील कुत्रे रात्री सतत भुंकत राहतात व कधी कधी दुपारी देखील भुंकत असतात…. रविवार दि. २ मार्च रोजी रात्री एक वाटसरू आपल्या घरी जात असता अचानक मगरी पाहून घाबरून मागे पळाला… यावेळी आमच्या जिल्हा प्रतिनिधीनेही ही बाब पाहिली आणि परिसरातील लोकांना कळताच काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली…

“ऐन उन्हाळ्यात मगरींचा तलावाकाठी मुक्त संचार” या बातमीची दखल घेत मंगळवारी दुपारी वन-अधिकारी सर्वेक्षण करण्यासाठी आले… तलावाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर त्यांना ते कठीण वाटले… वन-अधिकाऱ्यांनी बचाव पथकाशी संपर्क साधला… लगेचच रेस्क्यू टीम संध्याकाळपर्यंत पोहोचली आणि त्यांनी संयुक्तपणे किशोर मगरींना त्यांच्या मूळ अधिवासातील निवासस्थानात हलवण्याबाबत सविस्तर चर्चा केली… दरम्यान या तलाव भागाचे मालक तथा गावाचे पोलीस पाटीलही घटनास्थळी आले आणि त्यांनी अधिक माहिती दिली… काल रात्री देखील मगरी बरोबर एका कुत्र्याची झटापट झाली आहे… त्यांनी वन अधिकाऱ्यांना काही काळ वाट पाहण्याचे आवाहन केले… कारण  तलावातील पाणी सुकू लागले की मगरी नैसर्गिकरित्या निघून जातील आणि तलावात असेच जाऊ नका कारण इतर वन्य जलचर प्राणी देखील त्यात असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल असे सांगितले कारण की, मोठ्या संख्येने कासव, विविध प्रकारचे मासे, साप, खेकडे, बेडूक इतर जलचर प्राणी असल्याचे ऐकून अधिकारी आणि रेस्क्यू टीमने काही आठवडे वाट पाहण्याचे मान्य केले… पण परिसरातील लोकांनी मात्र जोरदार मागणी करीत विचारले की जर आमचे काही अनुचित नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण असेल ? यासाठी अखेर असे ठरविण्यात आले की काही दिवसांत ‘ड्रोन कॅमेरा’ द्वारे मगरींची निश्चित माहिती घेऊन त्यांना बाहेर काढून आदिवसात सोडले जाईल…

तलावाच्या नैसर्गिक जैवविविधतेला अडथळा न आणता इतर उपकरणांच्या मदतीने कारवाईचा निर्णय घेण्यात आला…. यावेळी वनक्षेत्रपाल श्री. डी.एस. सुभेदार, सहाय्यक वैशाली जालिंदर भोर, त्यांचे कार्यालयीन कर्मचारी, बचाव पथकाचे प्रमुख सागर दहेंबेकर, त्याचे टीम सदस्य, पक्षीप्रेमी शंतनू कुवेस्कर, तलाव जमिनीचे मालक श्री. नथुराम पोवार, निवासी भीमसेन वाले, सुनील धुमाळ, शुभम शिंदे सह अनेकजण उपस्थित होते….