सर्व विकास दीप संस्थेतर्फे ‘नारी शक्ती सन्मान’ सोहळा संपन्न…. 

0
40

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सर्व विकास दीप संस्था तर्फे नारी शक्ती सन्मान कार्यक्रमाचे आयोजन  शनिवार दि.०८ रोजी करण्यात आले होते…. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवर (तलाठी) सौं. ज्योती पठाणे, (वनरक्षक) कल्पना गायकवाड, पोलीस पाटील सौं, पूजा निमुणकर, सर्व विकास दीप संस्थेचे अध्यक्ष थॉमस भाऊ, लेखणीक पं. समिती श्री. युवराज सरडे सह मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले… तहसील कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी जगन मुकणे अण्णा यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उदघाटन केले….
यावेळी अ‍ॅड. मुबीन झटाम उपस्थित होते….  त्यानंतर माता सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला महिला (सी.आर.पी.) सौं. इरम टोळकर तसेच सौं. कल्पना गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली… म्हसळा येथील कॅनोसा संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदर असे स्वागत गीत सादर केले…. कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर यांना व्यासपीठावर पाचारण करुन सर्व विकास दीप संस्थेचे पदाधिकारी यांनी पुस्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन शासकीय, निमशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिला… जसे होमगार्ड मधील, पोलीस, टपाल कार्यालय, तलाठी, पंचायत समिती, नगर पंचायत, बाल प्रकल्प, प्रांत कार्यलय, रुग्णालय, तहसील कार्यालय, वन खाते, ग्रामसेविका, आससेविका, आदिवासी प्रकल्प, माध्यमिक, प्राथमिक विभाग, सेतू, अंगणवाडी, कृषी, एसटी विभाग, विद्युत, पोलीस सी.आर.पी आदि संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रातील एकूण २२ महिला बचतगटाचे सक्रिय कार्यकर्ते आणि सदर संस्थेचे महिला कार्यकर्ते कर्त्या अशा विविध विभागातील सेवा बजावणाऱ्या महिलांचा यथोचित गौरव करण्यात आला…  दरम्यानच्या काळात संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. स्वातीताई यांनी प्रस्तावना केली व संस्थेचे अहवाल सादर केले….
यानंतर जगन मुकणे, सौ.ज्योती पठाणे, मुख्याध्यापक जाधव सर आणि सौ.सीमा ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन सर्वांनी कार्यक्रमास निमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले… नंतर माणगाव, म्हसळा संस्था कार्यक्षेत्रात  असलेल्या विविध वाड्या तसेच आदिवासी वस्ती येथील महिला तसेच युवतींनी अतिशय सुंदर संस्कृतीक कार्यक्रम सादर केले… कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने करण्यात आली…
यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेतर्फे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले…  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्च विकास दीप संसस्थेचे अध्यक्ष फा.थॉमस भाऊ, फा. मॅथयू यांच्यासह कार्यकर्ते मंगेश हिलम, अक्षय जाधव, निर्मला ताई, मनीषा काणेकर, शर्मिला धाडवे, नरेश जाधव व सदस्य आणि सर्व वाडी प्रेरिका यांनी विशेष मेहनत घेतली… यावेळी म्हसळा येथील कॅनोसा, माणगावचे अमरदीप आणि इंदापूर येथील होली स्पिरिट संस्थेचे सिस्टर्स उपस्थित होत्या… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यकर्ते महेश मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीषा काणेकर यांनी केले…. दरम्यानाच्या काळात आलेल्या सर्व पाहुण्यांचा पाहुणचार सिस्टर अवेलिनताई व रोझीताई यांनी केला… सदर कार्यक्रमास सुमारे दीड हजार आदिवासी महिलांबरोबरच पुरुष, युवती, युवक त्याचबरोबर लहान मुले आयोजित जागतीक महिला दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली…. दरम्यान नारी स्त्री शक्ती पर सुंदर सजावट करुन ‘आम्ही जमीनवरील तारे’ चा यावेळी संदेश सजावट स्वरूपात दाखविल्याने खास लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले….