महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाड शहरातील नवेनगर येथील दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे… महाड शहर पोलीस ठाणे येथे विनयभंग व इतर कलमांतर्गत १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत… नर्मदा रमेश चिविलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित आरोपी यांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली… तसेच फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली… भांडण चालू असताना आरोपी यांनी फिर्यादी यांचा ब्लाउज फाडून त्यांचा विनयभंग उत्पन्न केल्याप्रकरणी आरोपी सुरज भोसले, भूषण भोसले, सुमेध प्रमोद भोसले, नितीन शांताराम काप, नितेश गणपत वाघमारे, संतोष गणपत रक्ते, ओमकार गजानन काप हे सर्व राहणार कुणबीआळी नवेनगर महाड यांच्या विरोधात भारतीय न्याय सहिता कलम 74, 189 (2),190, 191, 115 (2), 118(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे….
तरी परस्पर विरोधी फिर्यादी भूषण प्रमोद भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित आरोपींनी एकत्र जमाव जमवून फिर्यादी व त्यांच्या भावाला हाता बुक्क्याने मारहाण केली तसेच सर्व आरोपींनी फिर्यादी यांच्या घरासमोर दंगा करून फिर्यादी यांच्या पत्नीस हाताबुक्कीने मारहाण करून तिला जमिनीवर ढकलून दिले व फिर्यादी यांचे सासू यांचा ब्लाउज फाडला तसेच फिर्यादी यांच्या भावाची पत्नी हिचा ड्रेस फाडून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी अनिल भुवड, रुपेश उर्फ (बंटी) चिवीलकर, अक्षय रक्ते, कार्तिकेश उमासरे, रोहित उमासरे, विजय भुवड, हर्षल चिवीलकर सर्व राहणार नवेनगर महाड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74,189(2), 190, 191, 115(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत…