महाड येथे प्रधानमंत्री आवास व इतर घरकुल लाभार्थ्यांच्या घरांचा भूमिपूजन सोहळा संप्पन्न…. 

0
26

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :- 

प्रधानमंत्री आवास व इतर घरकुल लाभार्थ्यांच्या घरांचे भूमिपूजन माननीय नामदार भरत शेठ गोगावले, मंत्री हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास महाराष्ट्र आणि गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील माजी सरपंच श्री.  संदीप झांजे लोकप्रतिनिधी अधिकारी ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांच्या उपस्थित संपन्न झाले…  सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून, त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावरून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अलिबाग रायगड व तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालय महाड यांच्या कडून कार्यवाही सुरू आहे…
या संदर्भात सर्व केंद्र पुरस्कृत घरकुल योजनांच्या उद्दिष्ट नुसार शंभर टक्के मंजूरी देणे, बांधकाम सुरू नसलेली घरे सुरू करणे, अपूर्ण घरकुले पूर्ण करणे या संदर्भात मोहीम स्वरूपात कामकाज करून ग्रामीण गृहनिर्माण योजना गतिमान करणे व गृहनिर्माणाचा गुणात्मक दर्जा वाढविणे हा हेतू आहे…. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रम अंतर्गत महाड तालुक्यातील सर्व केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत घरकुल योजनातील सुरू असलेल्या एकूण २५०७ घरांच्या बांधकामाचा शुभारंभ महाड तालुक्यातील ग्रामपंचायत व सर्वच ग्रामपंचायतीत करण्यात आला… सदर उपक्रमात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत २४०७ व रमाई आवास योजनेअंतर्गत तेरा शबरी आवास योजना अंतर्गत चार पीएम मोदी आवास योजनेअंतर्गत १६० पीएम जनमन आवास योजनेअंतर्गत २३ असे एकूण २५०७ घरकुलांचा भूमिपूजन सोहळा करण्यात आला…
प्रदीप खोपकर यांच्या घराचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला… तसेच लाभार्थी महिलांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला… सदर कार्यक्रमास मा.श्री. भरतशेठ गोगावले, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, लाभार्थी श्री. मांढरे सर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते… प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन मधील घरकुल बांधकाम सुरू नसलेल्या लाभार्थींच्या घराचा भूमिपूजन सोहळा सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून, त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड यांच्या अत्यारीवरील पंचायत समिती कार्यालय महाड यांच्याकडून कार्यवाही सुरू आहे… या अंतर्गत सर्व केंद्र पुरस्कृत घरकुल योजना अंतर्गत उद्दिष्टानुसार शंभर टक्के मंजुरी देणे व बांधकाम सुरू नसलेली घरे सुरू करणे व अपूर्ण घरकुले पूर्ण करणे यासंदर्भात मोहीम स्वरूपात कामगाज करून ग्रामीण गृहनिर्माण योजना गतिमान करणे व गृहनिर्माणाचा  गुणात्मक दर्जा वाढविणे हा हेतू आहे…
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्वांसाठी घरे उपक्रमांतर्गत महाड तालुक्यातील सर्व केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेतील सुरू नसलेल्या एकूण २६०१ घरांच्या बांधकामाचा शुभारंभ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये महिलांच्या हस्ते आणि लोकप्रतिनिधी जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आला… सदर उपक्रमात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत २४०७ रमाई योजनेअंतर्गत १७ शबरी आवास योजनेअंतर्गत ७ मोदी आवास योजनेअंतर्गत १९२ पीएम जनगण आवास योजनेअंतर्गत ४७ असे एकूण २६७५  घरकुलांचे भूमिपूजन माननीय गोगावले साहेब यांच्या हस्ते तसेच पदाधिकारी, लाभार्थी व महिलांच्या हस्ते ग्रामपंचायत स्तरावर घरकुल बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला… सदर कार्यक्रमास अन्य गटविकास अधिकारी, डॉक्टर स्मिता पाटील मॅडम आणि सरपंच श्री. संदीप झांजे श्री. वाळूमुळे, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत आकले, ग्रामपंचायत घरकुल लाभार्थी श्री. प्रदीप खोपकर अगले शाखा अभियंता यांच्या उपस्थित पार पाडण्यात आला…