झेप फाऊंडेशनने केला महिलांचा सन्मान… सुलभा पाटील महिला गुण गौरव सोहळा संपन्न…

0
33

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

महिला सक्षमीकरण एक अभियान म्हणून यशोशिखर गाठलेल्या झेप फाऊंडेशनने महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या तालुक्यातील महिलांचा सुलभा पाटील महिला गुणगौरव पुरस्काराने सन्मान केला…  प्रसिद्ध अन्वेषक रजनी पंडित , सिने, नाट्य अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ,अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पंडित पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा झेप फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा चित्रा पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य भावना पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान सोहळा पार पडला…

सुलभा पाटील महिला गुणगौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये क्रीडा क्षेत्र धनुर्धर तनीषा वर्तक अलिबाग ,कबड्डी पटू रचना म्हात्रे, सामाजिक क्षेत्र सुप्रिया जेधे, शीतल माळी, वैद्यकीय क्षेत्र श्वेता धवन, अध्यात्मिक क्षेत्र श्रुती बोंद्रे, शैक्षणिक क्षेत्र सिया म्हात्रे, सारा पेरेकर, तनया पाटील, सुरक्षा क्षेत्र वेदिका पेडवी, औद्योगिक क्षेत्र नलिनी मुंबईकर, गावदेवी महिला बचतगट पनवेल, गायत्री महिला बचतगट अलिबाग यांचा सन्मान केला.