रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
आगामी काळात होळी, धुळीवंदन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रंगपंचमी व रमजान त्या सणाच्या अनुषंगाने रोहा तालुक्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सण साजरे करावे, असे आवाहन रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केले आहे… या सर्व सणानिमित्त सायबर गुन्हे शाखा व पोलीस यंत्रणा सतर्क असून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत… गावात येणारे प्रत्येक वाहन हे रस्त्यावर न लावून देता व्यवस्थित रस्त्याच्या बाहेर पार्किंग करून पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आलेले आहे…
पोलीस ठाणे हद्दीतील एसटी स्टँड आवारात दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली… रोहा पोलीस ठाणे ते वरचा मोहल्ला, अहिले हदीस मज्जिद, फिरोज टॉकीज, बोरी गल्ली, आडवी बाजार पेठ, तीन बत्तीस नाका, येवले कॉर्नर, एसटी स्टँड, नगरपालिका नाका, रायकर पार्क नाका असा रूट मार्च करण्यात आला… या रूट मार्च दरम्यान रोहा पोलीस ठाणे २ अधिकारी १५ अंमलदार, कोलाड पोलीस ठाणे १ अधिकारी, ५ अमलदार तसेच आरसीपी पाठवून माणगाव कडील ३१ अंमलदार हजर होते, अशी माहिती रोहा पोलिसांनी दिलेली आहे…