अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
धुलीवंदनानिमित्त अलिबागच्या साखर समुद्रकिनारी वल्ह्याने चालवायच्या होड्यांची स्पर्धा रंगली…साखर येथील कोळी समाजाने या स्पर्धेचे आयोजन केले होते…या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला…विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली…यांत्रिकी युगात हाताने चालवायच्या होड्या कालबाह्य होत चालल्या आहेत…अशावेळी ही परंपरा जपण्या बरोबरच नवीन पिढीला याची माहिती व्हावी यासाठी हा प्रयत्न इथल्या कोळी समाजाने केलाय…