सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीचे मजरीमध्ये रूपांतर…नायब तहसीलदारसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

0
32

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):- 

रायगड जिल्ह्यातील पेण शहरामधील पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाच्या आवारात असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार वाघोजी तुपे यांच्या ऐतिहासिक गढीवर मजरीमध्ये रूपांतर काही समाजकंटकांनी हिरवी चादर चढवून विटंबना केली आहे…विवेक मारुती तुपे सरदार (वय-४८  रा.हडपसर पुणे ) यांनी अखिल पठाण,दनिश पठाण ,रफीक नजीर तडवी,नागेश जगताप, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर ,झिशान अस्लम नाईक,अकीब अतिक मुजावर (सर्व रा.पेण ) यांच्याविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,इतिहासात असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वराज्याची स्थापना केली, त्यापैकी एक,नरवीर सरदार वाघोजी तुपे,नामदार खान हा अफजलखानाचा मावसभाऊ होता, कोकणातील कल्याण सुब्यात धुमाकूळ घालून आपली ठाणी बसवत होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीने सरदार वाघोजी तुपे यांनी हि लढाई लढली यात ते विजयी झाले परंतु वाघोजी तुपे हे जखमी झाले होते, काही कालांतराने त्यांचे निधन झाले… सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीचे अवशेष आजही पेण तहसील कार्यालय परिसरात आहें. या मजरीवर (समाधीवर)अखिल पठाण,दनिश पठाण ,रफीक नजीर तडवी,नागेश जगताप, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर,झिशान अस्लम नाईक, अकीब अतिक मुजावर यांनी दि.२८/०२/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० जे ६.०० वाचे सुमारास संगनमताने नरवीर सरदार वाघोजी तुपे यांच्या पवित्र समाधीवर हिरवी चादर चढवून फुले वाहुन नारे तकबीर अल्लाहू अकबर अशी घोषणा देवून समाधीस्थान अपवित्र केले…पेण पोलिस ठाण्यात नायब तहसीलदार प्रसाद कार्लेकर यांच्यासहित सात जणांवर सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला…