अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
उन्हाळा सुरू होताच रायगडसह सर्वच फळ बाजारात,रस्त्यांच्या कडेला थंडगार, रसाळ फळांच्या हंगामाला सुरुवात होत असते. सध्या बाजारात लाल रंगाचे रसरशीत कलिंगड, टरबूज दाखल झाले असून, ग्राहकांची सर्वाधिक मागणी आहे.उन्हाळा सुरू झाला असून, नागरिक रसाळ व थंडगार पेयाला पसंती देत असतात. त्यामुळे रस पेयाची मागणीदेखील वाढत आहे. शरीराला थंडावा देणारे कलिंगड बाजारात मुबलक उपलब्ध झाले असून, त्यांना ग्राहक पसंती देत आहेत…उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्यापाठोपाठ मार्च महिन्यापासून फळबाजारात,रस्त्यांच्या कडेला कलिंगड विक्री जोमात सुरू आहे…उन्हाळ्यात जीव पाणी-पाणी करत असल्याने, नागरिकांची पावलं आता आपोआप कलिंगडाच्या दुकानांकडे वळत आहेत…रसरशीत आणि आतून लालचुटूक असलेले कलिंगड बहुतांश जणांना आवडतात…अशातच रायगड जिल्ह्यात विविध तालुक्यात रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात कलिंगडची दुकाने पाहायला मिळत आहेत..लोकांनी कलिंगडाला मोठी पसंती दर्शवल्यामुळे रोह्यात देखील मोठ्या प्रमाणात कलिंगडाची मागणी वाढलीय…ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी कलिंगडचा आस्वाद घेण्यासाठी झाली होती…कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण व पोटेशियम प्रमाण जास्त असल्याने उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाल्ले जाते…त्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमीभासत नाही व आपले शरीर डिहायरेड पडत नाही.