माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रायगड जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे विद्यमान अध्यक्ष तथा स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले यांचे खासगी स्वीय सचिव राहिलेल्या ज्येष्ठ नेते आदरणीय सदानंद येलवे यांना “जीवन गौरव” पुरस्कार जाहीर झाला आहे… त्यांना येत्या २० मार्च, २०२५ रोजी महाड येथे संपन्न होणारा ‘क्रांती संग्राम दिनी.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते सन्मान होणार आहे….
दरम्यान १५ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद कृष्णाजी येलवे यांनी ८१ व्या वर्षात पदार्पण केले आहे… त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बौद्धजन पंचायत समितीचे माननीय सभापती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सन्माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. २० मार्च २०२५ रोजी, दुपारी १२ वा. महाड क्रांती संग्राम दिनी संपन्न होणारा कार्यक्रम दरम्यान सदानंद येलवे यांचे सन्मान “जीवन गौरव पुरस्कार” बहाल करून येथोचीत सत्कार केला जाणार आहे… सदानंद येलवे हे एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय नेते आहेत… ते गेली अनेक वर्षे जन सेवा कार्यामध्ये आपले योगदान देत आले आहेत… विविध सामाजिक, सैक्षणिक, संस्कृतीक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अविरत जनसेवा करणारी व्यक्ती म्हणून बौद्धजन पंचायत समिती माध्यमातून बहूद्धेवेशीय समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित होणार आहेत… सदानंद येलवे हे तळा तालुक्यातील वावे मांद्रज गाव येथीलचे आहे…. तसेच ते एक उच्च शिक्षितही आहे… त्यांनी इन्कम टॅक्स अधिकारी या पदाचा राजीनामा देऊन ग्रामीण भागात गेली अनेक दशकके समाजकार्य हाती घेऊन वाटचाल करीत आले आहेत…. त्यांच्या अंगी इंग्रजी भाषेची उत्कृष्ट पकड असल्याचेही आमच्या जिल्हा प्रतिनिधींनी सांगितले… आज त्यांचे वय ८१ असतानाही तरुणांसाठी ते एक प्रेरणादाई व्यक्तिमत्व देखील आहेत…