पनवेल हादरले… स्वारगेट घटनेची पुनरावृत्ती… बसस्टॉपवर सोडतो म्हणत अज्ञातस्थळी गाडी नेली…

0
38

 पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

ती त्याच्या शेजारी राहात होती.तिचं वय अवघं 15 वर्षाचं होतं.तिच्यावर मात्र त्याची वाईट नजर होती. तो संधीच्या शोधात होता.शेवटी त्याने संधी साधली आणि या 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केले.हा तरुण आणि पीडित तरुणी हे ओळखीचे होते.शिवाय ते एकमेकांच्या शेजारी राहणारे होते.ही घटना आहे पनवेलमधील…यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे… या प्रकरणी आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.

नमस्कार मी धनश्री आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज…राज्यात पुण्यातील स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झालेला असताना पनवेलमध्ये कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीवर इको चालकाने बसस्टॉपवर सोडतो असे सांगत गाडीत बसवले, त्यानंतर अज्ञात स्थळी नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 10 दिवसांपूर्वी झालेल्या घटनेनंतर मुलीने आज (15 मार्च) तिच्या पालकांना सगळा प्रकार सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात आरोपी अमोल पदरथवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ होत आहे.  इको चालकाकडून झालेल्या या घटनेनंतर मुंबई हादरली आहे.  महाराष्ट्राच्या राजधानीत विशेषत: तरुणी सुरक्षित प्रवासासाठी इको, कॅब, बस यासारख्या वाहनांचा वापर करतात. मात्र,  तिथेच तरुणींना सुरक्षेची भीती निर्माण झाली आहे.पनवेलमध्ये घडलेल्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली या प्रकरानंतर घाबरलेल्या विद्यार्थीनीने आपल्या आईवडिलांनाही घडल्या प्रकाराबद्दल सांगितले नव्हते. अखेर आज ही धक्कादायक बाब उघड झाली…

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 3 मार्चला सकाळी साडे सहा वाजता पीडित मुलगी शाळेत जाण्यासाठी एका बस स्टॉपवर थांबली होती. यावेळी नराधम आरोपी दुसऱ्या शाळेची बस घेऊन तिच्याजवळ गेलाय. त्याने तुला शाळेत सोडतो, असे सांगून बसमध्ये बसवलं. ही घटना सकाळी साडे सहा वाजताची असल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. याचा फायदा घेऊन नराधम आरोपी बस घेऊन शेतात गेला.शेतात गेल्यावर ‘तू मला आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो’, असं आरोपी पीडितेला म्हणाला. यानंतर आरोपीनं तिच्यावर बसमध्येच बलात्कार केला. मुलीने घाबरून अनेक दिवस याची माहिती घरात कुणालाही सांगितली नाही. मात्र दोन दिवसापूर्वी 13 मार्चला मुलीनं आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाची माहिती मिळताच मुलीच्या आईने पनवेल पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत तातडीने आरोपीला बेड्या ठोकल्या…आरोपीला १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे…मात्र शाळकरी मुलीवर अशाप्रकारे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेचा पुढील तपास पनवेल पोलीस करत आहेत…