अलिबाग शिवसत्ता टाइम्स (ओमकार नागावकर) : –
अलिबागची संस्कृती आणि इतिहासाला उजाळा देणारं आपल्या हक्काचं आपल्याचं मातीतील कलाकारांनी गायलेलं अलिबागचं गाणं दि.१५ मार्च रोजी भाग्यलक्ष्मी हॉल अलिबाग येथे भव्य सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आलं… यावेळी मराठी इंडियन आयडॉल विजेते सागर म्हात्रे, ई-टीवी गौरव महाराष्ट्राचा महाविजेते वैभव थोरवे यांनी सुमधुर आवाजाने श्रोत्यांचे कान मंत्रमुग्ध केले…
या गाण्याची संकल्पना रोहित पाटील, संगीत नवीन मोरे, रोहित नाईक यांनी व्हिडिओ एडिटिंग केलेले “अलिबाग आमची शान” हे गाणं मोठ्या दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आले… गाण्यातील सर्व कलाकार अलिबाग मधील असून, हे गाणं अलिबाग तालुक्याचे मान उंचावणारे असेल व येणाऱ्या पर्यटकांच्या तोंडावर राहणारे असेल हे नक्की, असे मान्यवरांनी सांगितले….
यावेळी अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच कला क्षेत्रातील मान्यवर रोहित पाटील लिखित गाण्याच्या उद्घाटन सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते…