अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध…पीडिता गर्भवती… आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल…

0
33

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

महाड तालुक्यातील छत्रीनिजामपूर आदिवासी वाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे…सविस्तर माहिती अशी संबंधित आरोपी याला पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील आरोपी याने पीडित मुलीची इच्छा नसताना देखील तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले यामध्ये पीडित मुलगी ही गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला आहे…संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपी विरोधात पॉस्को व इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे…महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुशल खेडेकर या संपूर्ण गंभीर गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत…