माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
राज मांजरे यांनी खेळ क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे… त्यांनी ते शिकत असलेल्या शिक्षण संस्थेचे नावा सोबतच रायगड जिल्ह्यासह तो राहत असलेल्या माणगाव तालुक्यातील खांदाड गावाचे नाव थेट राज्यात कोरून यश प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे….
राज सुप्रिया संतोष मांजरे यांनी नुकताच कोल्हापूर येथे लोकप्रिय असलेल्या कबड्डी खेळ स्पर्धेत भाग घेतला होता… या खेळामध्ये राज मांजरे यांनी उत्कृष्ट कबड्डीच्या कौशल्या दर्शन घडवत सारा संघाला विजय मिळवून देण्याची मोठी कामगिरी बजावून स्वतःला व संघाला तसेच शिकत असलेल्या श्रीमती गीता द.तटकरे पोलिटेक्निक शिक्षण संस्था (गोवे-कोलाड) राज राहत असलेल्या खांदाड गावासह येथील प्रसिद्ध सोनभैरव क्रीडा मंडळ (खांदाड) चे नाव कोरल्याबद्दल त्याचावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे…
यादरम्यान राज मांजरे हा युवक माणगाव शहर येथील सुपरिचित, सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या तसेच युवा नेता संतोष (बाळा) मांजरे यांचा मुलगा आहे… राज मांजरे प्रेमळ, अभ्यासात हुशार, क्रीडा क्षेत्रात नेहमी अनेक बक्षीस मिळवत असतो तसेच युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा आवडता युवा आहे… राज मांजरे यांच्या कामगिरीची दखल खुद्द तो शिकत असलेल्या शिक्षण संस्थेने घेत तो राहत असलेल्या गावात अष्टपैलू खिलाडी तसेच आमच्या टीमला जिंकून दिल्याबद्दल शुभेच्छापर बॅनर लावले आहेत… ग्रामस्थ, मित्रमंडळ, प्रतिष्ठित नागरिक तसेच मीडियाने या बॅनरची दखल घेत राज याला अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत…
यादरम्यान माजी नगरध्यक्ष ज्ञानदेव पोवार, सोनभैरव मंडळाचे अध्यक्ष काशीराम पोवार, पदाधिकारी, खांदाड गावातील नागरिक, युवक मंडळ, एकता मित्र मंडळ या सर्वांनी राज मांजरे याचे खास अभिनंदन केले आहे… राज मांजरे यांनी गावाचे नाव राज्यभर पोचवल्याने खांदाड गावाच्या वतीने येत्या काही दिवसांनी सोनभैरव मंदिर येथे खास सत्कार कार्यक्रम आयोजन केल्याचे खांदाड गावचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते काशीराम पोवार यांनी बोलताना सांगितले आहे….