महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने) :-
शासन मुलीच्या-महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे…महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रशासन कार्यरत असते परंतु गुन्हेगारांना आता कायदयाची देखील भीती राहिली नाहीये असे दिसून येत आहे…अशीच एक धक्कादायक घटना महाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मौजे वसाप या गावात घडली आहे…सदर तरुणी ही आपल्या मैत्रिणीच्या घरी काही कामानिमित्त गेली होती व ती रात्री घरी परतत असताना नराधम आरोपी लहू मोतीराम इवलेकर याने सदर तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत चल “मी तुला घरी सोडतो या बहाण्याने पीडितेची छेड काढली व विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…हा सर्व प्रकार लक्षात येताच तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला….आरोपी लहू मोतीराम इवलेकर याच्यावर भारतीय दंड संहितेनुसार कलम ३५४ व पॉस्को अंतर्गत ७,८,९ (एम) गुन्हा दाखल करण्यात आलाय…या गुन्हयाचा तपास महाड तालुका पोलिस ठाण्याचे सहा. फौजदार श्री. एस.डी. निमकर यांनी केला असून सदरचे दोषारोप पत्र मा जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले…या खटल्याची सुनावणी विशेष न्यायालय माणगाव-रायगड येथे झाली असून सदर खटल्यात अति शासकिय अभियोक्ता श्री योगेश तेंडूलकर यांनी कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले…आरोपी लहु मोतिराम इवलेकर यास दोषी ठरवून दि. १७ मार्च रोजी भा.द.वि.स. कलम ३५४ अन्वये ३ वर्ष सक्तमजूरी व रू १०,०००/- दंड व पोक्सो ८ अन्वये ३ वर्ष सक्तमजूरी व रू १०,०००/-दंडाची शिक्षा ठोठावली.या संपूर्ण घटनेचा तपास अंमलदार- ASI निमकर,पैरवी अधिकारी- PSI आघाव,मानगाव सेशन कोर्टपैरवी अंमलदार- ASI पवार,महाड तालुका पो. ठाणे यांनी केला…