रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त घालत असताना पोलिसांना रात्रीच्या सुमारास मोटरसायकलवर आलेल्या तरुणांकडे एक सिंगल नळी बंदूक व पाच प्लास्टिकचे आवरण असलेले १२ एमएम बोअरचे जिवंत काडतुसे आढळून आल्याने दोघांवर रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१५ मार्च रोजी रात्री ८ ते १६ मार्च २०२५ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विशाल शामकांत पाटील व होमगार्ड श्री.बांगर या दोघांना बीट मार्शल ड्युटीचे कर्तव्य देण्यात आले होते. त्यानुसार दोघेही पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दि.१६ मार्च २०१५ रोजी पहाटे १:३० सुमारास वावेघर येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाचे मागील ग्राउंड वरुन मोटार सायकल मुख्य रस्त्याच्या बाजूकडे भरधाव वेगाने आली आली असता कर्तव्यावर असणारे विशाल पाटील व होमगार्ड बांगर यांनी मोटरसायकल स्वारास थांबवुन त्यांच्याकडे विचारपूस केली असता ते दोघेही उडवा उडवी चे उत्तर देऊ लागले. कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी त्यांच्याकडील बॅग चेक करण्यासाठी मागितले असता त्यांनी ती बॅग चेक करण्यासाठी नकार दिल्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर अधिक संशय येऊ लागल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना सदर घटनेची माहिती फोनवरून दिली असता पोलीस निरीक्षक संजय बांगर आपल्या सहकाऱ्यांसमवेत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती धारपवार, पोलीस हवलदार सचिन चौरे,सुशांत पिंगळे, राहुल भडाळे,राजेश वळवी, रुपेश सपकाळ,आदींचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.पोलिसांचा ताफा पाहुन दोघांची बोबडी वळली मोटरसायकल वर आलेल्या तरुणां कडील बॅग दोन पंचांच्या समक्ष चेक केली असता बॅगेत एक सिंगल नळी बंदूक व ५ प्लास्टिकचे आवरण असलेले १२ एमएम बोअरचे जिवंत काडतुसे आढळून आलेत पोलिसांनी त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) भालचंद्र दत्तात्रेय शिद(वय३५) व कल्पेश रामचंद्र वाघ (वय२२) दोन्ही राहणार वारदोली तारटेप ठाकूरवाडी तालुका पनवेल असे असल्याचे सांगितले…
भालचंद्र शिद व कल्पेश वाघ यांच्या ताब्यातील बेकायदेशीररित्या शस्त्र व जिवंत काडतुसे तसेच त्यांच्या ताब्यातील MH.46CD 1381 क्रमांकाची शाईन मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतले असून या दोघांवर रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर६२/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर महत्वपूर्ण कामगिरी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे,खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या अधिपत्याखाली बीट मार्शल विशाल पाटील व होमगार्ड श्री बांगर यांनी केली आहे…सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव हे करीत आहेत…