मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर व मोटारसायकलचा अपघात… अपघातात मोटरसायकलस्वराचा जागीच मृत्यू… 

0
27

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-  

मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव येथे मोटरसायकल व कंटेनर यांचा अपघात होऊन मोटर सायकल चालक रफिक जामदार वय वर्ष 44 याचा कंटेनर अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यानंतर संतप्त जमावाने माणगावमध्ये मुंबई-गोवा महामार्ग अडवून धरला आहे..

यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या 10 किमी पर्यंत रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. एकीकडे महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाला निघालेले भीम अनुयायी देखील या वाहतूक कोंडीत अडकलेले पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे माणगाव येथील पोलीस प्रशासन सुद्धा हे प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत