हरिहरेश्वर कासव-संवर्धन प्रकल्प.. ८९ पिल्लांना समुद्रात सोडण्यात यशस्वी… नामशेष होत चाललेल्या कासवांच्या दुर्मिळ ऑलिव्ह रिडले जातीची सुरक्षा…

0
31

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे कासव-संवर्धन प्रकल्प राबविण्यात येतो…. या प्रकल्पाअंतर्गत अलिकडेच दुर्मिळ ऑलिव्ह रिडले जातीची ८९ पिल्लांना यशस्वीपणे समुद्रात सोडण्यात आली… येथे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करण्यात येते व नंतर त्यांतून बाहेर पडणारी पिल्ले टप्या – टप्प्याने समुद्रात सोडण्यात येतात… नामशेष होत चाललेल्या कासवांच्या या जातीचे गेल्या २० -२२ वर्षांपासून येथील ग्रामस्थ, वनविभाग व पर्यावरण प्रेमींकडून ही मोहीम राबविण्यात येते…

नोव्हेंबर-डिसेंबर अखेर किंवा मार्च-एप्रिल दरम्यान कासव मादी अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात आणि अंडी घालून झाली की परत खोल समुद्रात निघून जातात… कासव मादी अंडी घालतात त्या जागेला कासवाचे घरटे असे म्हणतात…. कासवांची ही घरटी सुरक्षित ठेवण्यासाठी येथील श्रीवर्धन तालुक्यातील वेगवेगळ्या समुद्र किनारपट्टीवर सातत्याने येथील पर्यावरण प्रेमी ग्रामस्थ व वनविभाग अधिकारी गेल्या तब्बल बावीस वर्षांपासून झटत आहेत….