डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील कंत्राटी कामगारांचे उपोषण… कंत्राटदार पद्धतीतून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी…

0
19

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त कर्मचारी वर्गाने आजपासून विद्यापीठात कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत आंदोलन पुकारले आहे…गेल्या २० वर्षापासून हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कमी पगारात काम करत आहेत…विद्यापिठ चालु होऊन जवळपास ३० – ३५ वर्षे झाली मात्र अजूनही या जागा अल्प दरात घेऊनसुद्धा  प्रकल्पग्रस्तांना कायम स्वरुपी सेवेत रुजू करण्यात आलेले नाही…त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर उपोषण सुरू ठेवले आहे…उपोषणादरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपोषणास भेट देत लवकरच प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यासाठी चर्चा करण्यात येईल असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले…तसेच या उपोषणास न्हावे, मांगरुळ, पन्हळघर, नागांव, चिंचली  तसेच आजाुबाजुच्या अनेक ग्रामस्थांनी तसेच मान्यवरांनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दर्शविला असून सकाळी १० वाजता सुरु झालेेले हे उपोषण रात्रीचे ८ वाजले तरी सुरुच आहे…