कोकणातील फळ-बागायतदारांच्या उत्कर्षासाठी चर्चासत्राचे आयोजन… शिवसेना नेते रामदासभाई कदम यांची दापोली विद्यापीठात बैठक…

0
31

दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

कोकणांतील फळप्रक्रिया उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी दापोली  विद्यापीठात विशेष बैठक घेतली.खेड तालुक्यातील जामगे येथे हाती घेण्यात आलेल्या कोल्ड स्टोअरेज शितगृहाच्या अनुषंगाने कोकणातील उत्पादीत होणाऱ्या फळे व भाज्या उत्पादकांना दर्जेदार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी व फळांचा रस,जेली, चाकलेट्स इत्यादी फळ-प्रक्रिया उद्योगावर आधारीत व्यवसाय निर्माण  व्हावा म्हणून शिवसेना नेते मा. रामदासभाई कदम यांनी आज कोकण कृषी विद्यापिठ येथे स्थानिक नेत्यांसह भेट दिली.

दरम्यान विद्यापीठ कुलगुरू तसेच उद्यान विद्या, अर्थशास्र,फुड प्रोसेसिंग इत्यादी विभागीय अधिकारी वर्गासोबत विशेष बैठक घेऊन याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या उद्योग व्यवसायास लागणारे सर्वोतोपरी सहकार्य विद्यापीठ स्तरावर करण्यासाठी महत्वाची भूमिका घेण्यात यावी अशा सूचना यावेळी रामदास भाईंनी संबंधीत अधिकारी वर्गाला केल्या. यावेळी स्थानिक शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. किशोरभाई देसाई, कोकण कृषी विद्यापीठ सिनेट सदस्य सुनिलजी दळवी, मा.नगराध्यक्ष राजेद्र पेठकर, श्री. मधुकर दळवी, श्री. दिलीप रूपारेल,श्री.शशांक घाग आदींची उपस्थिती होती…