महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने) :-
महाड एमआयडीसी परिसरात बेकायदेशीर टेस्टिंग लॅबवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे…. एनसीबी व एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत या बेकायदेशीर टेस्टिंग लॅबला सीलबंद केले आहे…. आरोपी राहुल बाळकृष्ण शेडगे याच्यावर एन.डी. पी. एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी याने महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत कुसुम इंटरप्राईजेस या नावाने कंपनी सुरू केली होती….
कंपनी सुरू असताना उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अनेक वेळा भेट दिली असता, आरोपीने त्याची कंपनी गेले एक वर्षापासून बंद केली होती, तसेच कोणीही कंपनी चालू करण्यासाठी जागा भाड्याने देणार नाही याची खबरदारीही पोलिसांनमार्फत घेण्यात आली मात्र गेली दोन महिन्यांपासून आरोपी याने महाड एमआयडीसी हद्दीतील प्लॉट नंबर x-126 मध्ये एका बंद गळ्यामध्ये बेकायदेशीर टेस्टिंग लॅब सुरू केली होती….
महाड एमआयडी परिसरामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर टेस्टिंग लॅबवर कारवाई करीत पोलिसांनी लॅबला टाळ ठोकल आहे… वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एनसीबी पोलीस निरीक्षक सुनील कुमार व राहुल ससाने तसेच एमआयडीसी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे…