रायगड मधील प्रधानमंत्री आवास व म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मिती…

0
49

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-

२०१६ मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचे शहरी भागातील रायगड जिल्ह्यातील पहिल्या गृहनिर्माण प्रकल्पाची सुरुवात पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील सावंत भागात सुरू झाले असून, या ठिकाणी ७५० घरांची निर्मिती येत्या १८ महिन्याच्या विक्रमी काळात करणार असल्याची माहिती या प्रकल्पाच्या विकासकांनी आज पत्रकार परिषदेत दिली…

संपूर्ण राज्य स्थितीमध्ये १७८ ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकल्प सुरू असल्याची माहिती देऊन कर्नाटक महाराष्ट्र नंतर आता नव्याने गुजरात मध्ये शहरी भागात अशा पद्धतीचे गृहनिर्माण प्रकल्प सुरू केल्याचे सांगण्यात आले… प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी घरकुल योजने करता एक लाख ५० हजार रुपये अनुदान दिले जाते… शहरी भागात या प्रकल्पामध्ये म्हाडा अंतर्भूत झाल्याचे प्रधानमंत्री आवासचे एक लाख ५० हजार अधिक माडाकडून एक लाख मिळून दोन लाख ५० हजार रुपयांच्या अनुदान वन बीएचके घरासाठी प्राप्त होणार असल्याची माहिती दिली यासाठी त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी केवळ एक हजार रुपये असेल असे स्पष्ट करण्यात आले…

ही योजना सुरू करताना केंद्र शासनाने सामान्य माणसांना स्वतःच्या हक्काचे घर असावे या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आली असल्याची माहिती देऊन रायगड जिल्ह्यात अशा पद्धतीचा हा मोठा प्रकल्प स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनातून सुरू करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेमध्ये नमूद करण्यात आले… जनसामान्यांचे स्वतःच्या हक्काची घराची असलेली स्वप्नपुर्ती या प्रकल्पामुळे पुर्ण होईल, असा विश्वास यावेळी संदीप पालकर यांनी व्यक्त केला… या योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व शासकीय मान्यता देण्यात आली असून, पाच परवानगी दिल्याची माहिती देण्यात आली असल्याचेही सांगितले… या प्रकल्पामध्ये शेतकरी नागरिक गोरगरीब ग्रामस्थांना योग्य दरामध्ये परवडेल अशा पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याची ही सोय करण्यात आल्याचे त्यांनी सांगून नागरिकांना या गृहनिर्माण प्रकल्पास भेट देऊन आपली स्वप्नपूर्ती करावी असे आवाहन करण्यात आले… हॉटेल विसावा येथे आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये प्रोजेक्ट असोसिएशन हनुमंत सावंत यांच्यासह जिल्हा प्रवक्ते नितीन पावले त्यामुळे तालुकाप्रमुख रवींद्र उर्फ बंधू तरडे या कार्यक्रमात नामदार भगत गोगावले यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते…