अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग तालुक्यातील ब्रिटीश कालीन रेवस बंदरावर रो रो जेटीसाठी आता पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. अलिबाग आणि उरण या दोन तालुक्यांमधील अंतर कमी होण्यासाठी रेवस-करंजा या मार्गावर रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे…मात्र सध्या प्रकल्पाचे काम पूर्णपणे थांबले आहे…वेळेत पूर्ण न केल्याने कंत्राटदाराकडून काम काढून घेण्यात आले आहे…शिल्लक ४० टक्के कामासाठी पुन्हा सुधारित दराने निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ३५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.