मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे ):-
रविवार दि. 23-3-2025 रोजी मुंबईतील काळाघोडा येथे रोटरी इंटरनॅशनल जिल्हा पातळी आणि रोटरी क्लबच्या वतीने भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली… डायबेटीस एवरनेसच्या रुग्णांकरिता मुंबई काळाघोडा ते सूर्यवंशी हॉल, शिवाजी पार्क, दादर अशी सायकल रॅली घेण्यात आली… यावेळी रोटरी इंटरनॅशनल क्लब जिल्हा 3141 चे अध्यक्ष चेतन देसाई उपस्थित होते… त्यांनी सांगितले कि, डायबिटीस एवरनेस व प्रिव्हेर्शनसाठी या भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, मुंबई आणि जवळच्या सगळ्याच विभागातील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सायकल रेसर्स आनंदाने या रॅलीत सहभागी होताना दिसून आले…
यावेळी एक वेगळाच उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला… डॉ. केतकी मेहता यांनी सांगितले कि, डायबेटीस एवरनेस साठी ही सायकल रॅली आयोजित केली असून, या रॅलीचे हे सोळावे वर्ष तब्बल पंधराशे ते दोन हजार सायकल रेसर्स यांनी या सायकल रॅलीत सहभागी होऊन उस्त्फुर्त प्रतिसाद दिला…. असाच एक सायकल प्रेमी विकास हा पेशाने अभियंता असून भविष्यात त्याला सायकल रेसर्स मध्ये देशाचे नाव उच्चपातळीवर नेऊन उंच्चाक करायचे आहे. राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल पातळीवर खेळाचे प्रतिनिधित्व करून ऑलिम्पिन्क मध्ये संधी घेऊन पुरस्कारांची लयलूट करायची आहे तसेच मनातून जिद्द करूनच मी पूढे जाईल असे त्याने सांगितले… या सायकल रॅलीत नर्गिस गौर सहित अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते….