माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
बुधवारी 11.30 वाजता माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील शांतता कमिटी सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, पत्रकार यांची आगामी सण/उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सभा घेण्यात आली असता उपविभागिय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले की आगामी सण, उत्सव साजरे करताना सामाजिक सलोखा कायम ठेवा व कायदा- सुव्यवस्थेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना दिल्या…..
१) धार्मिक व जातीय तेढ,जातीय सलोख्याला हानी पोहोचवणाऱ्या, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणाऱ्या, विशिष्ट समाजाला भडकविणाऱ्या कोणत्याही पोस्ट सोशल मीडिया द्वारे फॉरवर्ड करू नका…
२) कोणत्याही घटनेच्या पार्श्वभूमी विषयी संपूर्ण सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय अशा घटनेबाबत सार्वजनिक रित्या किंवा सोशल मीडियावर विचार व्यक्त करू नका. त्याबाबत समाजामध्ये अफवा पसरऊ नये किंवा अफवावर विश्वास देखील ठेवू नये…
३) सार्वजनिक भावना दुखावतील अशा प्रकारे स्टेटस किंवा पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नये…
४) आगामी काळामध्ये सर्व धर्मीय सण उत्सव साजरे केले जाणार आहेत… दम्यान शांतता प्रस्थापित राहील याबाबत दक्षता घ्यावी.
५) आपले राहते परिसरात जास्तीत cctv कॅमेरे बसविण्यात यावेत…
६) वाहतुकीचे नियम पाळावेत, लहान मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये…
सदर सभेस शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, पत्रकार अशा २० ते २५ जणांची उपस्थिती होती… दरम्यान पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे आणि एपिआय बेलदार या वेळी आवर्जून उपस्थित होते…