गुढीपाडवा, रमजान ईद सारखे धार्मिक उत्सवासाठी खबरदारी… खालापूर पोलिस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक…

0
26

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-  

आगामी गुढीपाडवा, रमजान ईद, महावीर जयंती, राम नवमी, हनुमान जयंती, आदी धार्मिक सण व उत्सव तसेच भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने खालापूर पोलिस स्टेशन येथे शांतता मोहल्ला कमिटी व पोलिस पाटील यांची संयुक्त बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस निरीक्षक सचिन पवार व संतोष आवटी यांच्या उपस्थितीत पार पडली.

धार्मिक व जातीय तेढ, सलोख्याला, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचविणाऱ्या, एखाद्या विशिष्ट समाजाला भडकविणाऱ्या कोणत्याही पोस्ट सोशल मीडिया द्वारे फॉर्वड करू नका… अशा  पोस्ट करणाऱ्याची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात यावी…आगामी काळामध्ये सर्वधर्मीय सण, उत्सव साजरे केले जाणार आहेत… दरम्यान शांततेचे वातावरण असावे याबाबत दक्षता घेण्यात यावी…  तसेच आगामी काळामध्ये खालापूर पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही… याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या… या अनुषंगाने मौजे हाळ खुर्द, हाळ बुद्रुक व महड या ठिकाणी रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते…