पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये आढळल्या माती आणि अळ्या… रुग्णालय औषधोपचारासाठी की रोगाचा प्रसार होण्यासाठी ?

0
54

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

           रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये माती आणि छोट्या छोट्या अळ्या असल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाच्या आणि नातेवाईक यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या बाह्य रुग्ण आणि अंतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी फिल्टरची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेली आहे.

जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या अंतर रुग्ण इमारतीमध्ये असणाऱ्या काहीं फिल्टरमध्ये माती सहित अळ्या आढळून आल्या आहेत. त्याचप्रमाणे नवजात शिशू यांच्या विभागात असणाऱ्या फिल्टरची पाहणी केली असता त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात माती आढळून आली. सदर फिल्टरची पाहणी करीत असताना तेथे असणारे रुग्ण आणि नातेवाईक यांनी सांगितले की सदर पाण्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येत आहे.हे पाणी आम्ही किंवा नवजात अर्भक माता यांनी पिले ते आम्हाला ही उलट्या जुलाब सारखे रोग होऊ शकतात. रुग्णालय हे औषधोपचार साठी आहे का येथून रोगाचा प्रसार व्हावा यासाठी आहे हे कळत नाही… आमची खासगी रुग्णालयात उपचार करून घेण्याची परिस्थिती नसल्याने आम्ही येथे आलो आहे…

पाण्यात येणाऱ्या वादाबदल येथील कर्मचारी यांना सांगितले असता ते कानाडोळा करीत असतात… आम्ही वाद केला तर आमच्या रुग्णाला त्रास होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात आहे अशी माहिती रुपाली भाटे यांनी दिली आहे…