ऑल इंडिया चालक मालक महासंघाच्या वतीने मुंबई पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन… 

0
31

मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे ):- 

गुरुवार दि. २७-०३-२०२५ आज ऑल इंडिया चालक मालक महासंघाच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकारपरिषद घेण्यात आली…ऑल इंडिया चालक मालक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश सदाशिव समुखराव यांच्या प्रमुख नेतृत्वात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले…

भारतातील १४० करोड लोकसंख्येच्या देशामध्ये आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारा अतिमहत्वाचा घटक म्हणजे वाहन चालक आहे… परंतु सरकार प्रशासन यांच्याकडे दुर्लक्ष करतो… वाहन अपघाती मृत्यू झाला तर त्याला कोणत्याही प्रकारची सरकार आणि प्रशासन मदत करत नाही… राज्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आर्टिओ पोलीस व इतर चोरी चपाटी या लोकांपासून वाहन चालकांना मारहाणी व भुकमारीचा प्रकार मोठया प्रमाणात आहे, याकडे कोणाचेही लक्ष नाही किंवा तसेच सरकारने स्वतंत्र कोणत्याही प्रकारचा फायदा केला नाही, म्हणून वाहक चालक व मालकांच्या न्याय हक्कासाठी राज्यातील सर्व संघटना एकत्र येऊन सरकारला येणाऱ्या काळामध्ये आव्हान करणार आहोत… ट्रक, टँकर्स, बस, टेम्पो चालक मालक यांचे कुटुंब आणि या कटुंबावर अवलंबून असणारे १५ जण असे ३० ते ४० माणसं एका गाडीवर उदरनिर्वाह करतात… शासन, सरकार आणि नागरिक, आरटीओ यांच्या अत्याचाराला आमचा संघ बळी पडतो… जर एवढे नुकसान होत असेल, तर आमचा उदरनिर्वाह कसा होईल…? एकीकडे भाडे वाढ, डिझेल-पेट्रोल यांचा भाव गगनात भिडलेला असून, आम्ही चिंतेत असतो… आमचा संपूर्ण परिवार यावर चालतो… आमच्या महाराष्ट्र सरकारकडे काही प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याच पाहिजे…

महाराष्ट्र राज्यातील सर्व टोल टॅक्स बंद झाले पाहिजेत… महाराष्ट्र वाहन चालक मालक अभ्यास आयोग घटित करावा, वाहनचालकांसाठी स्वतंत्र सरकारी धोरण तयार करावे, वाहन चालकांच्या मृत्युच्या पच्छात त्यांच्या परिवाराला तात्काळ १० लाख रुपये मिळायला पाहिजे… महाराष्ट्र राज्याच्या सर्व महामार्गांवर १०० किलोमीटरवर वाहन चालकांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह बांधावे, वाहन चालकांच्या मृत्यू पच्छात परिवारातील एक सदस्य सरकारी सेवेत रुजू करावा… राज्यात जेव्हा डिझेल भाडेवाढ होते तेव्हा वेळेला गाडी मालकांचे भाडे सुद्धा वाढवण्याची तरतूद करावी अश्या मागण्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सरचिटणीस यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, केंद्रीय आणि राज्य पेट्रोलियम मंत्री यांच्याजवळ केलेल्या आहेत… पत्रकार परिषदेला ऑल इंडिया चालक मालक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश समुखराव, राज्य चालक मालक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र सकपाळ, सरचिटणीस भगवान कारभारी, खजिनदार महेश राऊत, उपखजिनदार दत्तात्रय इलग, सदस्य राजेंद्र गोरे, नंदकुमार गोरे, देवेंद्रसिंग राजपूत आणि ऑल इंडिया चालक मालक महासंघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते…