धुतुम गावातील रहिवाशांना मोफत फिल्टर्सचे वाटप… गुढीपाडव्यानिमित्त सौर ऊर्जा प्रकल्पाचे अनावरण…

0
45

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १५ टक्के समाजकल्याण निधी अंतर्गत १०० टक्के घरपट्टी भरणाऱ्या कुटुंबांचे आरोग्य उत्तम राहावे या दुष्टीकोनातून गुढीपाडवा निमित्त शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या रहिवाशांसाठी मोफत फिल्टर्सचे वाटप करण्यात आले… तसेच धुतूम गावातील व्यायामशाळेसाठी सीबर्ड मरीन सी एफ एस च्या माध्यमातून सी. एस .आर. निधी अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुढीपाडवा दिनाचे औचित्य साधून करण्यात आले…

धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुचिता प्रेमनाथ ठाकूर या आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने गावाच्या विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत, त्याचा एक भाग म्हणून त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते… या कार्यक्रमासाठी उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर, सरपंच सौ.सुचिता प्रेमनाथ ठाकूर, उपसरपंच चंद्रकांत कमलाकर ठाकूर, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे जनरल मॅनेजर राधाकृष्ण घायाळ, इंडियन आँईल अदानी प्रकल्पाचे अधिकारी संदीप काळे, सी वर्ल्ड कंपनीचे व्हा.प्रेसिडेर श्रीनिवास, जेएनपीए बंदराचे ट्रस्टी रविंद्र पाटील, माजी सरपंच शंकर ठाकूर, अवसारे, प्रफुल्ल म्हात्रे, परमानंद पाटील, राजन कडू, सुजित ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य स्मिता ठाकूर, रविनाथ ठाकूर, प्रकाश ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, अनिता ठाकूर, करिश्मा ठाकूर, कविता पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नागनाथ घाडगे सह ग्रामस्थ उपस्थित होते…

या कार्यक्रमाचे औचित्य साधून उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर, परिसरातील प्रकल्पातील अधिकारी, जेष्ठ नागरिक वर्गाने धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा आदर्श तालुक्यातील इतर सरपंचांनी गावाच्या विकासासाठी अंगीकारणे गरजेचे असल्याचे सांगितले…