गुढीपाडवा निमित्त दहिवडी येथे प्रभू श्रीरामाची शोभयात्रा…

0
67

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो… नवीन वर्षाची सुरुवात देखील या सणापासूनच होते… प्रत्येक कुटुंब आपल्या घराबाहेर गुढी उभा करून पूजन करीत असतात… महाड तालुक्यातील दहिवड येथे गुढीपाडवा निमित्त प्रभू रामाची शोभायात्रा काढण्यात आली… सद्गुरु ज्ञाननाथ स्वामी महाराज यांनी राम जन्मोत्सव सुरू करून 55 वर्षे पूर्ण झाली… मागील सतरा वर्षापासून दहिवड ग्रामस्थांकडून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली…  मोठ्या जल्लोषामध्ये गावातून राम जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली… या शोभयात्रेमध्ये महिलावर्ग, लहान मुलं व अनेक तरुण, तरुणी यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता… खालुबाजाच्या ठेक्यावर वाजत गाजत प्रभू श्रीरामांची शोभयात्रा संपूर्ण गावातून घराघरांमध्ये काढण्यात आली…