माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
माणगाव पोलीस ठाण्यातर्फे दुसऱ्यांदा ज्यांची “आपला एडव्हायझरी” तसेच “ट्रस्ट इंटरप्रायझेस” मध्ये आर्थिक फसवणूक झाली आहे… अश्यानी माणगाव पोलीस ठाण्यात येऊन तक्रारी नोंदवाव्यात म्हणून खास आवाहन केले आहे… या पूर्वीही आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रारी नोंदविल्या होत्या… त्यांची दखल घेऊन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती… दरम्यान गुन्हा नोंद क्रमांक ११५/२०२४, भा.दं.वि.सं. कलम ४२०, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (आस्थापनांमधील) हित संवधांचे रक्षण करण्याबाबतचे अधिनियम ३, ४ अन्वये द. २४/०४/२०२४ रोजी गुन्हा दाखल झालेला आहे…
सदर गुन्ह्यामध्ये आरोपी:-
१) संदेश सुरेश कवडे, रा. वंदना अपार्टमेंट, कचेरी रोड, माणगाव, ता. माणगाव, जि. रायगड
२) मनोज सदानंद तेटगुरे, रा. साळवे, ता. माणगाव, जि. रायगड यांनी श्रीकृपा अपार्टमेंट, विकास कॉलनी, माणगाव ता. माणगाव, जि. रायगड
३) देवेंद्र पांडुरंग गायकवाड, रा. निजामपुर, ता. माणगाव, जि. रायगड
४) संजय बाळकृष्ण गायकवाड, रा. लक्ष्मी अपार्टमेंट कचेरी रोड माणगाव, ता. माणगाव, जि. रायगड यांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे.
आतापर्यंतच्या झालेल्या तपासामध्ये गुन्ह्यातील वर नमूद आरोपींनी चौघा जणांच्या भागीदारीत “आपला अॅडव्हायझरी” व “ट्रस्ट इंटरप्रायझेस” नावांनी कंपनी स्थापनकरुन, बिझनेस ऑफीस सुरु केले असल्याचे लोकांना सांगून, त्याबिझनेस मध्ये लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगून, लोकांनी केलेल्या गुंतवणूकीची रक्कम व्यवसायात टाकून, त्या व्यवसायातील मिळणाऱ्या नफ्यातून गुंतवणूकदारांना नफ्याची ६ टक्के ते ७ टक्के रक्कम प्रत्येक महिन्याला देऊ असे सांगितले व लोंकांचा विश्वास संपादन केला होता… त्यानंतर आरोपींच्याकडे त्यांच्या सांगण्यावरुन गुंतवणूक करणाऱ्या लोकांना नफ्याची ६ टक्के ते ७ टक्के रक्कम परत देण्यास टाळाटाळ करुन, आरोपींनी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली असल्याचे निषन्न झाले आहे…
वर नमूद आरोपींकडून अशा प्रकारे फसवणूक झालेल्या लोकांनी आणखी किती खोल वर फसवणूक झाली आहे… याबाबत तपास करण्यासाठी संबंधीतानी त्याबाबत तक्रार दाखल करावी असे आवाहन माणगांव पोलीस ठाणे यांचेकडून पुन्हा करण्यात येत आहे…